प्रत्येक आठवड्याला पोलीस स्टेशन स्तरावरती तक्रार निवारण दिन
आंबेगाव तालुका प्रतिनिधी:-ता.१९/४/२०२२ मंचर तालुका आंबेगाव. माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशानुसार पोलिस स्टेशन स्तरा वरती प्रत्येक आठवड्याला तक्रार निवारण दिन होणार आहे. दिनांक २०/४/२०२०बुधवारी रोजी तक्रार निवारण दिन होणार आहे. यावेळी वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी दुय्यम पोलीस अधिकारी, व ठाणे अंमलदार उपस्थित राहणार आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता नागरिकांनी व तक्रारदारांनी हजर राहावे,असे आवाहन डॉ. अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या ठिकाणी तक्रार निवारण दिन होणार आहे. तरी नागरिकांनी व तक्रारदारांनी उपस्थित राहावे.
No comments:
Post a Comment