बारामती शहर पोलीस ठाण्यात हे शांतता कमिटी बैठक व इफ्तार पार्टीचे आयोजन.. बारामती:-बारामती शहर पोलीस ठाण्यात तर्फे पावणेसात वाजण्याच्या सुमारास जुनी तहसील कचेरी मध्ये बारामती शहर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व धर्मियांची शांतता कमिटी बैठक व इफ्तार पार्टीचे नियोजन करण्यात आले होते. या वेळी सगळ्या राजकीय पक्षाचे मान्यवर नेते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मुस्लिम बांधव हिंदू बांधव ,महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या बारामती शहरांमध्ये सामाजिक सलोखा हा कायमच चांगला असल्याचे बरेच वक्त्यांनी प्रतिपादन केली. याही पुढे सर्व समाजातर्फे सर्वांच धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहकार्य केले जाईल. कोणत्याही प्रकारचे सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याबद्दल पोलिसांना सहकार्य करण्याची सर्व वक्त्यांनी भूमिका मांडली. बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाली बारामती शहर पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
Post Top Ad
Saturday, April 30, 2022
बारामती शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटी बैठक व इफ्तार पार्टीचे आयोजन..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment