शरद सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध
आंबेगाव तालुका (प्रतिनिधी- कैलास गायकवाड):- ता.१४/४/२०२२ मंचर तालुका आंबेगाव येथील शरद सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली,असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी. एस.रोकडे यांनी आज गुरुवार दिनांक 14 रोजी दिली.
बँकेच्या जुन्या संचालकांपैकी पाच जणांची वर्णी पुन्हा लागली असून, त्यामध्ये बँकेचे विद्यमान अध्यक्ष देवेंद्र शहा, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, शिवाजीराव लोंढे,पांडुरंग पवार, दत्ता थोरात, अशोक आदक पाटील त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर नवीन चेहऱ्यांमध्ये अजय घुले, सुदाम काळे, संतोष धुमाळ, किसन सईद, जयसिंग थोरात, किशोर दांगट, प्रदीप आमूंडकर,रूपाली झोडगे, सुषमा शिंदे, दौलत भाई लोखंडे, मारुती लोहकरे. यांचा समावेश आहे.
बँकेचे निवडणूक जाहीर झाल्यानंतर १७ जागांसाठी८५ उमेदवारी अर्ज आले होते. त्यातील ६८उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली निवडणूक बिनविरोध झाली. महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या शरद बँकेच्या एकूणh सत्तावीस शाखा आहेत. सुमारे दोन हजार शंभर कोटी रुपयांची उलाढाल व एक हजार २६० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. ९०० कोटी कर्ज वाटप आहे.
क्लिप पंधरा वर्षे गेली पंधरा वर्षे बँकेचे विद्यमान अध्यक्ष देवेंद्र शहा हे बँकेचे अध्यक्षपद भूषवित आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मार्गदर्शन, जुन्या व नव्या संचालकांचा मेळ घालत निवडणूक बिनविरोध केली. ठेवीदार सभासदांचा भक्कम विश्वास व देवेंद्र शेठ शाह यांची व्यवसायिक दूरदृष्टी यामुळेही बँक प्रगतिपथावर ती आहे.
No comments:
Post a Comment