* घरफोडी करणारे, मोटरसायकल चोरी करणारे पाठोपाठ बारामती तालुका पोलिसांनी जेसीबी चोर सुुद्धा पकडले*
बारामती:- बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक21/12/2021 रोजी शिरसुफळ तालुका बारामती जि. पुणे येथून 10लाख रुपये किंमतीचा जेसीबी चोरून नेले बाबत तक्रारदार गणेश कल्याण जाधव रा. शेळगाव ता.इंदापूर जि. पुणे यांचे तक्रारीवरून गुन्हा रजि. नं.739/21 भादवि कलम 379 ,34 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशन यांनी चोरट्यांना पकडण्यासाठी योग्य त्या सूचना व मार्गदर्शन केले होते . त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे , तपास पथकातील पोलिस अंमलदार राम कानगुडे ,पोलीस नाईक सुधीर काळे,पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत व पोलीस नाईक अमोल नरूटे ,रणजीत मुळीक चोरट्यांना शोधण्यासाठी कसोशिने प्रयत्न चालू केले होते. दिनांक 28/ 4/2022 रोजी त्यांच्या प्रयत्नांना यश आले . व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या व चोरून नेलेला जेसीबी देखील भोर, जि.पुणे येथून जप्त केला आहे .यामध्ये चोरी करणारे 1) सौरभ धनाजी चव्हाण वय 22 वर्षे रा. कुरवली तालुका इंदापूर जिल्हा पुणे
2) संतोष नामदेव घाडगे वय 33 वर्ष रा. धांगवडी ता. भोर जि. पुणे हे आरोपी असून यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो बारामती यांनी 1/5/2022 पर्यंत पोलिस कस्टडी दिली आहे .गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलिस नाईक काळे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक अभिनव जी देशमुख साहेब पुणे ग्रामीण .अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद जी मोहिते साहेब बारामती विभाग पुणे ग्रामीण .उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे साहेब बारामती विभाग. पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण बारामती तालुका पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे पोलीस हवा. राम कानगुडे . पोलीस नाईक, सुधीर काळे, अमोल नरूटे, रणजीत मुळीक ,पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत , पोलीस नाईक गावडे या सर्वांनी मिळून केली असून पुढील तपास त्याचा तपास पोलीस नाईक सुधीर काळे हे करीत आहेत
No comments:
Post a Comment