डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अंथुर्णे २०२२ यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न.
इंदापूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अंथुर्णे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी भरघोस प्रतिसाद देत 51 बॅग रक्तदान करून इंदापूर तालुक्यात एक अनोखा उपक्रम राबविला.रक्तदात्यांना रक्तदान केल्याबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहीची फोटो फ्रेम भेट स्वरूपात देण्यात आली व प्रमाणपत्रही देण्यात आले.कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती विभाग बारामती गणेश इंगळे साहेब व इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील साहेब स्वतः उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांना रक्तदानाच्या ठिकाणी आणण्याची जबाबदारी इंदापूर तालुक्याचे युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव धाईंजे यांनी पार पाडली. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहीची फोटो फ्रेम भेट देण्यात आली व खूप छान नियोजन केले म्हणून सर्व आयोजक संदीप साबळे,प्रतिक साबळे, विशाल सोनवणे यांचे कौतुक उपविभागीय पोलिस अधिकारी व तहसीलदार इंदापूर यांनी केले.प्रमुख पाहुण्यांना रक्तदानाच्या ठिकाणी आणण्याची जबाबदारी वैभव धाईंजे यांनी पार पाडली म्हणून वैभव धाईंजे यांचे आभार व्यक्त करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहीची फोटो फ्रेम भेट देण्यात आली.
No comments:
Post a Comment