बारामती तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू होती दारू भट्टी, मेडद, जळोची व माळेगाव बु. परिसरात निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क दौंड विभागाची मोठी कारवाई... बारामती:-बारामती तालुक्यातील अवैध दारू भट्टयावर कारवाईचा बडगा उचलत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई झाल्याने समाधान व्यक्त होत आहे, वादग्रस्त न्यूज ने याबाबत नेहमीच बातम्या प्रसिद्ध केल्या याची दखल घेतली, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कारवाई करण्याचे धाडसत्र सुरू झाले आहे, नुकताच अवैद्य गावठी हातभट्टी दारू
निर्मिती व अवैद्य ताडी वाहतुक करणाऱ्यावर केलेल्या कारवाईत १,३९,५००/- चा
३० एप्रिल २०२२ मध्ये निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग, जि. पुणे
यांनी त्यांच्या सर्व स्टाफ सह बारामती तालुक्यातील मेडद, जळोची, माळेगाव बु.
परिसरात बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू निर्मिती अवैद्य ताडी वाहतुक करून विक्री
करणा-या विविध ०४ ठिकाणी छापे टाकुण एकुण ०४ गुन्हयांची नोंद करण्यात आलेले असून ०१ आरोपींना अटक करण्यात आलेले आहे. व ०१ दुचाकी जप्त करण्यात आलेली आहे सदर गुन्हयांतील जप्त मुद्देमाल रसायण ३४०० लिटर, गावठी हातभट्टी दारू ७० लिटर, ताडी ४५ लि. असा एकुण रु.१३९५००/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय
उप-आयुक्त श्री प्रसाद सुर्वे व अधिक्षक श्री संतोष झगडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाई मध्ये निरीक्षक श्री विजय मनाळे, दुय्यम
निरीक्षक श्री डी. बी. पाटील, दौंड बीट क्र. २ जि. पुणे दुय्यम निरीक्षक श्री. एस. एल. मांजरे, दौंड बीट क्र. १ जि. पुणे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक विकास थोरात, जवान वर्ग श्री वामन माळी, श्री. दत्तात्रय साळुंके, महिला जवान श्रीमती निलम धुमाळ, जवान नि.वाहन चालक श्री केशव वामने यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment