*संभाजी बढे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ निरंकारी सत्संग संपन्न !*
बारामती: - संत निरंकारी मंडळाच्या बारामती क्षेत्रात सेवादार म्हणून गेली ३० ते ३५ वर्षे अविरतपणे सेवा करणारे महात्मा संभाजी बढे यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ माळेगाव खुर्द येथे बुधवारी (ता.६ ) सायंकाळी ७ ते ९ या वेळेत निरंकारी सत्संगाचे आयोजन केले होते.
सदर सत्संग सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तर झोनचे प्रचारक सतीश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितत संपन्न झाला.
या प्रसंगी बारामती शाखेचे संचालक शशिकांत सकट, सेवादल शिक्षक बाळासाहेब जानकर, सेवादल साहाय्यक संचालिका वर्षाताई चव्हाण, सर्वश्री सचिन ढोबळे, बाबासो पारसे, बापूराव टेम्बरे, मनोज जाधव यांच्यासह माळेगाव, बारामती, फलटण आदी भागातून २०० ते २५० चा जनसमुदाय उपस्थित होता.
सदरचा सत्संग व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी माळेगाव सत्संगचे प्रबंधक मचिंद्र तावरे, प्रल्हाद आडके, संतोष ढवळे, प्रशांत भोसले, विनोद भोसले, गणेश तावरे, यांच्यासह सेवादल आणि सेवादल भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन महादेव गायकवाड यांनी केले.
No comments:
Post a Comment