मेडद विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा अध्यक्षपदी तुषार गावडे तर उपाध्यक्षपदी शिवाजी गटकळ यांची बिनविरोध निवड, १११ वर्षानंतर सत्ताबदल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 20, 2022

मेडद विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा अध्यक्षपदी तुषार गावडे तर उपाध्यक्षपदी शिवाजी गटकळ यांची बिनविरोध निवड, १११ वर्षानंतर सत्ताबदल..

मेडद विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा अध्यक्षपदी तुषार गावडे तर उपाध्यक्षपदी शिवाजी गटकळ यांची बिनविरोध  निवड, १११ वर्षानंतर सत्ताबदल..

बारामती: मेडद (ता. बारामती):- येथील  मेडद विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी तुषार राजाराम गावडे तर उपाध्यक्षपदी शिवाजी मारुती गटकळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद व्यक्त केला.मेडद विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी अमर गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडली. अध्यक्षपदासाठी तुषार राजाराम गावडे तर उपाध्यक्षपदासाठी शिवाजी मारुती गटकळ यांचे अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्याने मेडद गावच्या इतिहासात पहिल्यांदाच १११ वर्षानंतर युवक वर्गाच्या हाती सत्ता आल्याने  युवक वर्गात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
     या सोसायटीची सभासद संख्या ६९२ आहे. एकूण १३ जागेसाठी ही निवडणूक पार पडली संचालक मंडळामध्ये राहुल अनिल खोमणे, देविदास सोमनाथ गावडे, शिवराम बापूराव गावडे, संदीप दत्तात्रय गावडे, सतिश बापूराव गावडे, जनाबाई ज्ञानदेव गावडे, वर्षा दीपक गावडे, नवनाथ बापू गावडे, राजेंद्र रामचंद्र झगडे, हनुमंत बबनराव काळे,संतोष बापूराव गावडे अशी एकूण १३ जनाची  बॉडी आहे.

No comments:

Post a Comment