लोणी ( ता.आंबेगाव ) येथील काळूबाई मंदिर परिसरात लावला पिंजरा. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 12, 2022

लोणी ( ता.आंबेगाव ) येथील काळूबाई मंदिर परिसरात लावला पिंजरा.

लोणी ( ता.आंबेगाव ) येथील काळूबाई मंदिर परिसरात लावला पिंजरा.                        लोणी-धामणी : (प्रतिनिधी कैलास गायकवाड):- 
 दिः१२/०४/२०२२. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पोंदेवाडी, लाखणगाव,देवगाव,काठापूर,जारकरवाडी या बागायत पट्यात काही ठिकाणी ऊस तोड झाली आहे.तर काही ठिकाणी ऊस तोड चालू आहे. त्यामुळे दडण कमी होत चालल्यामुळे बिबट्याने आपला मोर्चा जिरायत भागातीत लोणी,धामणी खडकवाडी परिसरात वळविला आहे.त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणी,धामणी,खडकवाडी या परिसरात या अगोदर अनेक वेळा बिबटयाचे दर्शन झाले आहे. शिवाय या परिसरात अनेक वेळा बिबट्याने जनावरांनवर हल्ले केले आहेत.त्यामुळे बिबट्याच्या वावरामुळे या परिसरात चिंतेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी ग्रामस्यांनी केली होती.यातच गेली आठ दिवस लोणी खडकवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे वनविभागाने लोणी येथील काळूबाई मंदिरा परिसरात पिंजरा लावल्याने ग्रामस्थ शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.या परिसरात बिबट्या कोणाला दिसल्यास त्वरीत वन विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. ______________________________

No comments:

Post a Comment