पोलीस स्टेशन समोरील आवारात मारामारी करीत असलेल्या लोकांवर केला गुन्हा दाखल..
आंबेगाव तालुका (प्रतिनिधी कैलास गायकवाड ):-ता.१२/४/२०२२ मंचर तालुका आंबेगाव येथील पोलीस स्टेशनच्या समोरील मोकळ्या जागेत मारामारी करीत असताना, गुन्ह्यातील इसमा वर पोलिसांनी केली फिर्याद दाखल. आरोपी १ संजय वसंत राठोड २) त्याची पत्नी अर्चना संजय राठोड दोन्ही सध्या राहणार गणेशवाडी कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. मूळ राहणार लोंजे तांडा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव व इसम नामे लक्ष्मण सुरेश राठोड, संदीप सुरेश राठोड, गोरक्ष ताराचंद पवार, व महिला वाक्या बाई सुरेश राठोड सर्व राहणार सध्या भराडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. मूळ राहणार ओरडे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव. या सर्वांनी पोलीस स्टेशनच्या समोरील मोकळ्या आवारात मोठ्यामोठ्याने आरडाओरडा करीत, व शिवीगाळ करत, एकामेकांना लाथाबुक्क्यांनी व हाताने मारहाण करीत होते. व एकमेकांशी झोंबाझोंबी करत असताना आढळून आले. त्यांच्यावरती मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई फिरोज अब्दुल मोमीन यांनी फिर्याद दाखल केली. भारतीय दंड विधान क १६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घोडेगाव कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक हिले हे करत आहेत.
No comments:
Post a Comment