राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील शिपाई
आणि खासगी व्यक्तीला लाच लुचपत विभागाने केले अटक..
पुणे : महाराष्ट्रात सद्या लाच घेण्याचे प्रमाण वाढत चाललंय हे सतत प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या वरून लक्षात येत आहे, असाच प्रकार घडला याबाबत सविस्तर असे की,परमिट रुमच्या लायसन्ससाठी लागणारी कागदपत्र संबंधित कार्यालयांकडून मिळवण्यासाठी त्यांना पत्र पाठवण्यासाठी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय पुणे येथील शिपाई उत्तम किसन(वय
45) आणि खासगी व्यक्ती विठ्ठल चव्हाण यांना 5
हजाराची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई मंगळवारी (दि.12) करण्यात आली.याबाबत 25 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.त्यानुसार पोलिसांनी सोमवारी पडताळणी करुन आज (मंगळवार) सापळा रचून दोघांना अटक केली. तक्रारदार यांनी परमिटरूमचे
लायसन्स मिळवण्यासाठी अर्ज केला आहे.त्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे पत्र पोलीिस आयुक्त व वाहतूक शाखेला पाठवण्यासाठी उत्तम धिंगळे याने पाच हजार रुपयांची लाच मागितली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे
परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार पोलीस हवालदार अंकुश माने, चालक पोलीस कॉन्स्टेबल अभिजित राऊत यांनी केली.
No comments:
Post a Comment