भीमाशंकर सहकारी साखर कारखान्या मार्फत टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, April 25, 2022

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्या मार्फत टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा...

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्या मार्फत टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा... 

पारगाव प्रतिनिधी (पियुष गायकवाड):- ता.२४/4/२०२२ लोणी ता. आंबेगाव येथील बांधन वस्ती, शिंदे वस्ती, डोंगरभाग, लंके खोमणे वस्ती ,शिवडी या वस्त्यांमध्ये पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. विहीर  व बोअर ची पाण्याची पातळी खोल गेली व कोरडे पडले आहेत. त्यामुळे या वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. जनावरे व नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत  होते. वरील वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा योजना नसलेमुळे ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेचे पाणी येथील नागरिकांना मिळत नाही. उन्हाळ्यात तीव्र  पाणी  टंचाई ला सामोरे जावे लागत आहे. याची दखल घेऊन जिल्हा परिषद मा. उपाध्यक्ष विवेक दादा वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून व महाराष्ट्र राज्य गृहमंत्री मा. ना.दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भीमाशंकर साखर कारखाना मार्फत लोणी गावातील वाड्या वस्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई दुर व्हावी यासाठी पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला आहे. याकामी भीमाशंकर कारखाना चेअरमन मा. बाळासाहेब बेंडे ,संचालक प्रदिप वळसे पाटील यांचे सहकार्य मिळाले आहे. टँकर सुरू करण्यासाठी लोणीचे सरपंच मा. उर्मिलाताई धुमाळ यांनी प्रयत्न करून पाठपुरावा केला. टँकर चे पुजन भीमाशंकर कारखाना संचालक  आस्वारे, लोणी च्या सरपंच ऊर्मिला ताई धुमाळ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पंचायत समिती गण प्रमुख बाळशिराम वाळुंज, उपसरपंच अनिल पंचरास, सोसायटी संचालक उत्तम आदक,संभाजी पडवळ, बापूसाहेब पडवळ यांच्या हस्ते करण्यात आले.

No comments:

Post a Comment