मनशांती साठी आध्यात्म हा एक मेव चांगला मार्ग आहे- ह.भ.प. किरण महाराज भागवत... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, April 17, 2022

मनशांती साठी आध्यात्म हा एक मेव चांगला मार्ग आहे- ह.भ.प. किरण महाराज भागवत...

मनशांती साठी आध्यात्म हा एक मेव चांगला मार्ग आहे- ह.भ.प. किरण महाराज भागवत...                                                                 निरगुडसर: प्रतिनिधी.प्रतिक अरुण गोरडे:- दिः१६/०४/२०२२. आई वडिलांची सेवा हि सर्वोच्च सेवा आहे. आळंदी पंढरीची वारी करण्यापेक्षा आईवडिलांची सेवा करा त्यामध्ये तुम्हाला विठठल रुख्मिनीचे दर्शन घडेल. आजची तरूण पिडी अध्यात्माकडे वळली आहे. हि खरोखर कौतूकाची बाब आहे. मनशांती साठी आध्यात्म हा एक मेव चांगला मार्ग आहे.असे प्रतिपादन ह.भ.प. किरण महाराज भागवत यांनी केले. मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथील ढगेस्थळ येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा आयोजित केला होता.त्यावेळी ह.भ.प.भागवत बोलत होते. यावेळी पहाटे ५ ते ७ वाजता अभिषेक व देवजन्म, सकाळी ९ ते ११ वाजता ग्रंथराज ज्ञानेश्वरी बारावा अध्याय पारायण, सायंकाळी ४ ते ५वाजता हरिपाठ व सायंकाळी ७ ते ९ वाजता हरिकिर्तन आयोजित करण्यात आले होते.नंतर महाप्रसाद देण्यात आला.रात्री दहा वाजता स्वरतरंग भजणी तरुण मंडळ वाळुंजनगर यांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज ढगे पाटील, पै.विजय आदक, विठठल ढगे पाटील,रवि ढगे पाटील,शनि ढगेपाटील,संभाजी ढगे पाटील,ॲड. आशोक पालेकर,बबन ढगे पाटील,फकिरा आदक, प्रतिक गोरडे, नवनाथ आदक,कैलास ढगे पाटील,व ढगेस्थळ ग्रामस्थांनी केले होते. _________________________

No comments:

Post a Comment