धक्कादायक.. 36 व्या वर्षी पोलीस कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, May 8, 2022

धक्कादायक.. 36 व्या वर्षी पोलीस कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन..

धक्कादायक.. 36 व्या वर्षी पोलीस कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन..                                                                                                                     पुणे :-सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून यासाठी कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस अहोरात्र प्रयत्न करीत आहे, स्वतःच्या प्रकृती कडे लक्ष द्यायला वेळ nahi वारंवार लादल्या गेलेल्या ड्युटी यामुळे त्रस्त झालेले पोलीस कर्मचारी मानसिक तणावात गेल्याचे व त्यातून बरे वाईट घटना घडल्याचे ऐकले आहे, अशाच तणावात काम करीत असलेले आपले पोलीस बांधव व त्यांची होणारी वाताहत पाहवत नाही अश्यातच काही दुःखद घटना घडून जातात अशीच एक घटना घडली अवघ्या 36 वर्षे असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा हृदय विकाराने निधन झाले याबाबत सविस्तर माहिती अशी की,शिरगाव पोलीस चौकीत कार्यरत असणारे पोलीस नाईक दिलीप बोरकर  यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 36 वर्षांचे होते. आज (रविवार) साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांना त्रास होऊ लागल्याने देहुरोड येथील पवना हॉस्पिटलमध्ये  उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मूर्त्यु झाल्याचे समजले, दिलीप बोरकर हे शिरगाव पोलीस चौकशी स्थापन झाल्यापासून या ठिकाणी कार्यरत होते दिलीप बोरकर हे मुळचे नांदेड जिल्ह्यातील
होते. अत्यंत साध्या स्वभावाचे आणि मितभाषी
असल्याचे त्यांच्या 2007 च्या बॅचचे मित्र घाडगे
यांनी पोलीसनामा सोबत बोलताना सांगितले.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वरिष्ठ
अधिकाऱ्यांनी हॉस्पीटलमध्य धाव घेतली. बोरकर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.  शिरगाव पोलीस चौकीच्या पोलीस निरीक्षक
वनिता धुमाळ यांनी सांगितले की,दिलीप बोरकर हे 2007 च्या बॅचे आहेत. ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील आहेत. यांच्या निधनाचे वृत्त त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आल्याने धक्का बसल्याचे कळतंय.

No comments:

Post a Comment