चाकण उपडाक घराचे नवीन जागी स्थलांतरण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 23, 2022

चाकण उपडाक घराचे नवीन जागी स्थलांतरण..

चाकण उपडाक घराचे नवीन जागी स्थलांतरण..
पुणे:- पुणे ग्रामीण डाक विभागांतर्गत कार्यरत असलेले चाकण उपडाकघराचे नवीन अद्ययावत जागेत स्थलांतरण आणि उद्घाटन समारंभ आरती हाईटस, चाकण पेट्रोल पंपाजवळ, चाकण येथे दिनांक २३.०५.२०२२ वार सोमवार रोजी माननीय सु. श्री. सिमरन कौर, मा. डाक निदेशक, पुणे क्षेत्र ह्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
ह्याप्रसंगी श्री. बी. पी. एरंडे, अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण तसेच श्री. सागर सुरेश बनकर, नगरसेवक, चाकण नगरपरिषद इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यासाठी श्री. प्रमोद भोगाडे, डाक निरीक्षक, खेड उपविभाग ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमास इतर मान्यवर अधिकारी, डाक
कर्मचारी आणि ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.सुकन्या समृद्धी योजनेवर आधारित “ सही रास्ता “ ह्या अतुल क्रीएशन्स, पुणे दिग्दर्शित लघुपटाचे अनावरण देखील माननीय सु. श्री. सिमरन कौर, मा. डाक निदेशक, पुणे क्षेत्र ह्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. चाकण औद्योगिक नगरीच्या नागरिकांना डाक सेवेचा लाभ अधिक सुलभतेने मिळणार आहे. पोस्ट ऑफिस मध्ये असणाऱ्या पारंपारिक बचत, डाक, विमा ह्या सेवा ह्याआधीच डाक विभागाने तंत्र ज्ञानाची जोड देऊन समाजाभिमुख बनवल्या आहेत. मात्र अपुऱ्या जागेअभावी नागरिकांना ह्या सेवांपासून वंचित राहावे लागत होते. आता आधारकार्ड, कॉमन सर्विस सेंटर सारख्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच अधिकाधिक
बचतीच्या उद्देशाने जास्तीत जास्त खाते उघडावीत, असे आवाहन श्री. बी. पी. एरंडे, अधीक्षक डाकघर ह्यांच्या वतीने करण्यात आले.

No comments:

Post a Comment