मिशन एक लाख नवीन खाते अंतर्गत बारामती मुख्य डाकघरात एका दिवसात ६२१ नवीन खाते उघडण्याचा विक्रम...
बारामती:- पुणे ग्रामीण डाक विभागाच्या वतीने मे महिन्यात 'मिशन एक लाख" नवीन खाते
उघडण्याची विशेषः मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील मुख्य
डाकघर, सर्व उप डाकघरे व शाखा डाकघरे यांचेमार्फत बचत बँक, मासिक प्राप्ती योजना,
आवर्ती खाते, मुदत ठेव, भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी योजना, जेष्ठ नागरिक इत्यादी
आहे. पुणे क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत पुणे, सोलापूर, सातारा आणि अहमदनगर हे चार जिल्हे समाविष्ट आहेत. यामधील बारामती मुख्य डाकघरात दिनांक २० मे २०२२ रोजी ६२१ नवीन खाती श्री अमृत कुमटकर, सहायक अधीक्षक, बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली उघडण्यात आलेली आहेत. पुणे क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत मे महिन्यात एका दिवसात ६२१ नवीन खाती उघडून बारामती मुख्य डाकघराने विकम केलेला आहे. या बद्दल बारामती मुख्य डाकघरातील सर्व कर्मचारी व ग्रामीण डाक सेवक कर्मचारी यांचे पुणे ग्रामीण डाक विभागाचे अधीक्षक श्री बी.पी.एरंडे यांनी कौतुक केले आहे व पुणे जिल्ह्यातील जनतेने
आपल्या नजीकच्या डाकघरात भेट देवून प्रत्येक घरातून किमान एक नवीन खाते उघडावे
असे आवाहन त्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment