बारामती मध्ये पूर्ववैमनस्यातून खुनाचे प्रयत्नाचा गुन्हा दाखल..
बारामती:- गणेश बलभीम धोत्रे वय सत्तावीस वर्ष व्यवसाय जुन्या गाड्यांची विक्री राहणार नेवासे रोड नायगावकर हॉस्पिटल च्या मागे यांनी पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली की पूर्वी ते कृष्णा जाधव यांच्या मटक्या अड्ड्यावर काम करत होते व त्यांचे साथीदार होते. कृष्णा जाधव यांचा 2018 मध्ये खून झालेला आहे. सदरच्या गुन्ह्यातून सुनील संभाजी माने व विनोद शिवाजी माने हे काही दिवसांपूर्वीच जामीनावर आलेले आहेत. दिनांक 9 मे रोजी सायंकाळी फिर्यादी यांना सुनील संभाजी माने याने मोबाईल फोन करून सातव चौक या ठिकाणी पत्रा शेड जवळ बोलून घेतले त्यांची दहशत असल्यामुळे सदरचा फिर्यादी तात्काळ त्या ठिकाणी आला त्या ठिकाणी सुनील संभाजी माने व विनोद शिवाजी माने हे पांढऱ्या रंगाच्या कारमधून त्या ठिकाणी आणखी दोन लोकांसह आलेले होते
त्यावेळी सुनील माने हा त्यांना म्हणाला की गाडी विक्रीतून त्याने खूप पैसे कमावले आहेत तसेच त्याचा मटक्याचा धंदा चालू आहे. त्यामुळे फिर्यादी ने त्यांना दोन लाख रुपये द्यावेत. त्यावेळी फिर्यादी त्याला म्हणाला की त्याची परिस्थिती गरीब आहे तो त्यांना पैसे देऊ शकत नाही त्यावेळेस सुनील माने याने त्याच्या दिशेने तलवारीचा वार केला त्याने तो चुकवला त्यानंतर विनोद माने यांनी त्याला काठीने मारहाण केली सुनील माने याने त्याच्या नरड्यावर पाय दिला त्यानंतर आणखी दोन इसमांनी त्याला पकडले त्यावेळेस त्याच्या खिशातून 13 हजार रुपये काढून घेतल्याचे त्याने फिर्यादीत सांगितले. फिर्यादी हा अत्यंत भयभीत झालेला होता .त्यांच्या सांगण्याप्रमाणे फिर्याद नोंदवून सदरचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्याकडे देण्यात आला वरील दोन्ही आरोपींना तात्काळ गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय, पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत दोन्ही आरोपींना माननीय न्यायालयासमोर रिमांड साठी हजर करण्यात येणार आहे पुढील तपास सुरू आहे. शहरामध्ये कोणाही विरुद्ध जर दादागिरी किंवा दहशतीच्या तक्रारी असतील तर त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क करावा मोठा गुन्हा होण्याअगोदर सदर लोकांच्यावर कारवाई केली जाईल.
No comments:
Post a Comment