बैलगाडा घाटात खिशातून पैसे काढताना चोरट्यास पकडले..
--------------------------------------
आंबेगाव तालुका प्रतिनिधी:- ता.१०/५/२०२२ कारेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील बैलगाडा घाटात किसन अण्णा गायकवाड वय ५०वर्ष राहणार देहू फाटा झोपडपट्टी ता. हवेली जिल्हा पुणे यास दुपारी एक वाजण्याच्या सुमारास, तुकाराम जयराम कराळे वय वर्षे ६० व्यवसाय शेती राहणार कारेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. यांच्या खिशातील ३० हजार रुपये
खिशातून काढताना रंगेहात पकडले. सदर इसम किसन अण्णा गायकवाड याच्यावर भा द वि कलम ३७९ प्रमाणे फिर्यादी तुकाराम जयराम कराळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार नाडेकर करत आहेत.
No comments:
Post a Comment