पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित...कामकाजात
हलगर्जीपणा केल्याचा ठपका.!
सोलापूर : - पोलीस वारंवार चुका का करतात व व निलंबित होतात हे पुन्हा एकदा अशीच घटना सोलापूर मध्ये घडली,वरिष्ठांनी दिलेल्या
सूचनांकडे दुर्लक्ष करुन कामकाजाची संपूर्ण
माहिती न देता अर्धवट माहिती देऊन कर्तव्यात
कसूर केल्या प्रकरणी सोलापूर पोलीस आयुक्तालयातील राखीव पोलीस निरीक्षक भगवान व्ही.टोणे आणि राखीव पोलीस
उपनिरीक्षक नागेश पवार यांना तडकाफडकी
निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश पोलीस आयुक्त हरीश बैजल
यांनी काढले आहेत.सोलापूर पोलीस मुख्यालयातील अमंलदारांना दैनंदिन कामाचे वाटप करताना काही जणांना महिनो-महिने शुल्लक प्रकारच्या ड्यूटी देणे, त्यांना झुकते माप देणे तसेच एकाच ठिकाणी नेमणूक करुन
अमंलदारांवर अन्याय केल्याचे आदेशात नमूद
केले आहे. सहायक पोलीस आयुक्त प्रशासन यांनी भेट देवून आळी-पाळीने कर्तव्य नेमण्यास सांगितले होते.वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करुन कामकाजाची माहिती पूर्ण न देता अर्धवट देऊन कामकाजात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत राखीव पोलीस निरीक्षक आणि राखीव पोलीस
उपनिरीक्षक यांना पोलीस आयुक्त हरीश बैजल
यांनी निलंबन केले.इतर पोलीस निरीक्षक भगवान व्हि. टोणे आणि राखीव पोलीस उपनिरीक्षक नागेश पवार यांनी नागरी सेवा
कायद्यातील महाराष्ट्र नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे सोलापूर पोलीस खात्याची
प्रतिमा मलीन झाली आहे. निलंबन कालावधीत
खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार
नाही. तसेच निर्वाह भत्ता घेताना खासगी
व्यवसाय व नोकरी करत नसल्याचे प्रमाणपत्र
सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment