बारामतीत कॅनॉलमध्ये सिमेंटचे काँक्रीट मुळे पाण्यात पडलेला व्यक्ती काढण्यास होतेय अडचण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 19, 2022

बारामतीत कॅनॉलमध्ये सिमेंटचे काँक्रीट मुळे पाण्यात पडलेला व्यक्ती काढण्यास होतेय अडचण..

बारामतीत कॅनॉलमध्ये सिमेंटचे काँक्रीट मुळे पाण्यात पडलेला व्यक्ती काढण्यास होतेय अडचण..                                                बारामती:- बारामती विकासाच्या दृष्टीने वाटचाल करीत असल्याने बारामतीकराना आनंदच आहे, अनेक विकास कामे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बारामती मध्ये करण्यासाठी रात्र दिवस झटत आहे हे आपण पाहत आहोत त्यांच्या सारखा विकास करणारा नेता दुसरा आहे की नाही माहीत नाही पण अजितदादाचा गुणगौरव करावा तेवढे थोडेच आहे, पण हे सर्व होत असताना बारामती मधील काही अधिकारी मंडळीवर बारामती मधील नागरिक नाराज असल्याचे दिसते नव्हे तशी वागणूक देखील मिळत असल्याचे बोलले जातंय अशी अनेक उदाहरणे आहे.कोट्यवधी रुपये खर्च करून प्रशासकीय भवन बांधले पण या इमारतीत भव्य असे विविध विभागाचे कार्यालय उभे केले याच कार्यालयातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात मात्र केव्हाही जावा तिथे अधिकारी व शाखा अभियंता उपस्थित नसतात तर विचारणा केली असता हे अधिकारी जुन्या ऑफिस मध्ये आहे असे सांगितले जाते त्यामुळे तक्रार दार अथवा येणारे नागरिक याची पुरती धावपळ होते यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना लेखी निवेदन देऊन कल्पना देणार असल्याचे सामाजिक संघटना यांनी सांगितले आहे, तर याबाबत सविस्तर प्रसिद्ध करणारच आहोत तूर्तास पाटबंधारे खात्याच्या अखत्यारीत येत असलेल्या कॅनॉल च्या सिमेंट कॉक्रीटीकरण मुळे बाहेर येण्यास अडथळा ठरत आहे, पहाटे व सायंकाळी जेष्ठ नागरिक या कॅनॉल वरून फिरायला जात असतात त्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या  अचानक तोल गेला किंवा पाय घसरून पडले तसेच चुकून एखादा अथवा जीव देण्याचा उद्देशाने कोणी उडी मारली तर त्याला बाहेर येण्यासाठी पायऱ्या नाहीत तर पकडण्यासाठी जागा किंवा कप्पे नाही यामुळे पडलेला व्यक्ती लांब पर्यंत वाहून गेल्यास त्याचा जीवही जाऊ शकतो कारण असाच  इंदापूर रोड येथील एक व्यक्ती काही महिन्यांपूर्वी वाहून गेल्याने जीव गेला असल्याचे कळतंय अश्या वेळेस वाचवण्यासाठी कुठेही पायऱ्या नाही की पकडण्यासाठी सुरक्षा कप्पे नाही,सद्या सुट्टीचे व उन्हाळ्याचे दिवस असल्याने काही मुले कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी जात असल्याचे दिसते अश्या वेळी ही कॉक्रीटीकरण धोक्याचे असल्याचे दिसते.त्यामुळे लवकरात लवकर कॅनॉल च्या कडेने सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना राबविण्यात यावेत तसेच या कॉक्रीटीकरण मध्ये पकडण्यासाठी कप्पे करावेत अशी मागणी होत आहे..***

No comments:

Post a Comment