वसंतनगर मधील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, त्वरित दखल घेण्याची मागणी.. बारामती:- बारामती मधील वसंतनगर येथे रेल्वे लाईन लगत दत्तमंदिर व समाजमंदिर मागे असणाऱ्या सार्वजनिक शौचालय ची दुरवस्था गेल्या अनेक महिन्यापासून झाली असून येथील नागरिक वेळोवेळी पाठपुरावा करतात मात्र दुर्लक्ष होतंय लवकरच,येथील नागरिक आंदोलन करण्याचा भूमिकेत आहेत आपण लक्ष घालावे असे बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी माहिती दिली गेल्या अनेक महिन्यापासून या परिसरातील शौचालयाची अवस्था वाईट झाल्याने व या मध्ये भांडे तुटून गेल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याने याबाबत वारंवार कल्पना देऊनही अद्याप पर्यंत दखल न घेतल्यास लवकरच जन आंदोलन करणार असल्याचे संतोष जाधव यांनी सांगितले
Post Top Ad
Monday, May 23, 2022
वसंतनगर मधील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, त्वरित दखल घेण्याची मागणी..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment