जिल्हा परिषद शाळेतील मुलांचे पोस्टात बचत खाते काढण्यासाठी पुणे ग्रामीण विभागात विशेष मोहीम...
पुणे:- जिल्हा परिषद शाळेतील जे विद्यार्थी समग्र शिक्षा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या
गणवेशाच्या अनुदानापासून वंचित राहत आहेत आशा विद्याथ्यांना जिल्हा परिषद
निधीतून सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षासाठी गणवेशासाठी निधी देण्यात येणार
असल्याने सदरचे अनुदान विद्यार्थ्यांच्या पोस्ट खात्यामध्ये वर्ग करायचे असल्याचे
जिल्हा परिषद पुणे यांनी पत्र क्रमांक जिप/शिक्षण / प्राथ / २ / ४९४ /१४८८/२०२२
दिनांक २७.०४.२०२२ रोजीच्या पत्राद्वारे कळविले आहे. त्यासाठी पुणे ग्रामीण
विभागामधील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये विद्यार्थ्यांचे खाते उघडण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.त्याचबरोबर इतर बचत योजनांची एक लाख खाते उघडण्याची मोहीम या
महिन्यात सुरु आहे. सर्व विद्यार्थ्यांची पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडण्याचे
आवाहन शिक्षक व पालक यांना श्री बी पी एरंडे अधीक्षक डाकघर पुणे ग्रामीण यांनी
केले आहे.
No comments:
Post a Comment