धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता...
बारामती (वार्ताहर): हात उसने रक्कमेच्या व्यवहारात दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपी दत्तकृपा डेव्हलपर्स तर्फे प्रमोद मधुकर खराडे यांची मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मे.वागडोळे कोर्टाने निर्दोष मुक्तता केली.
फिर्यादीने आरोपीला रक्कम दिलेली सिद्ध करू शकला नसल्याचा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला असता मे. कोर्टाने आरोपीस निर्दोष मुक्तता केली. फिर्यादी किरण कदम यांनी दत्तकृपा डेव्हलपर्स तर्फे येथील प्रमोद खराडे यांना हात उसने १ लाख रक्कम दिली होती. त्या रक्कमेपोटी आरोपीने १ लाख रूपयांचा धनादेश दिला होता.आरोपीच्या वतीने अॅड. मेघराज नालंदे, व निलेश वाबळे यांनी काम पाहिले.
No comments:
Post a Comment