पोलीस कर्मचाऱ्यावरच गुन्हा दाखल, पत्नीने केली तक्रार..!
बारामती:- बारामती शहर या ठिकाणी नेमणुकीस असणारे पोलीस कर्मचारी अकबर कादीर शेख वय 27 याचा विवाह दिनांक 31. 3 .2018 रोजी तक्रारदार यांच्यासोबत आळंदी या ठिकाणी झालेला आहे. त्यांना एक मुलगा आहे. लग्न झाल्यापासून गैरअर्जदार यांनी तक्रारदार महिला तिला कधीही मूळगावी नेले नाही तसेच छोट्या-मोठ्या कारणावरून त्रास देण्यास सुरुवात केली. हे लग्न होण्यापूर्वी सुद्धा त्याचे पहिले लग्न झाल्याचा तक्रारदार यांना माहिती समजली. याबाबत तक्रार त्याच्याशी बोलले असता तिला दमदाटी केली. तसेच तक्रार यांच्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवले. तसेच तिच्या व मुलाच्या नावाची कोणतीही कागदपत्रे अद्याप काढलेली नाहीत. या प्रकारची तक्रार दाखल केल्याने सदर कर्मचाऱ्यावर 498अ 504 506 व सदर महिलेने पुरवणी जबाब दिल्याने भादवि कलम 377 प्रमाणे कलम वाड करून गुन्हा दाखल केलेला आहे, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे करत आहेत.
No comments:
Post a Comment