टकारी समाजाच्या युवकावर मृत्यूचा घाला, मोरगाव - जेजुरी रस्त्यावर लघुशंकेसाठी थांबलेल्या युवकाला मोटारसायकलने उडविल्याने जागीच मृत्यू. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 30, 2022

टकारी समाजाच्या युवकावर मृत्यूचा घाला, मोरगाव - जेजुरी रस्त्यावर लघुशंकेसाठी थांबलेल्या युवकाला मोटारसायकलने उडविल्याने जागीच मृत्यू.

टकारी समाजाच्या युवकावर मृत्यूचा घाला, मोरगाव - जेजुरी रस्त्यावर लघुशंकेसाठी
 थांबलेल्या युवकाला मोटारसायकलने उडविल्याने जागीच मृत्यू.
बारामती:- पुण्याला जाणाऱ्या मोरगाव जेजुरी रस्त्यावर बारामती कडे येत असताना, लघुशंकेसाठी  थांबला असता मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू
झाला.झालेल्या अपघातात भवानीनगर
येथील टकारी समाजातील एका तीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.मोरगाव - जेजुरी रस्त्यावर दि २९ रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास भवानीनगर येथील चार मित्र चारचाकी वाहनाने जेजुरी वरुन भवानीनगर येथे येत
असताना चोरवाडी परीसरात आले असताना लघुशंकेसाठी थांबले होते. यामध्ये विनोद जाधव, वय वर्षे ३२(रा. भवानीनगर, ता. इंदापुर जि. पुणे) हे सुद्धा थांबले होते. याच दरम्यान अज्ञान
दुचाकीने जोरदार ठोस दिल्याने विनोद यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना उपचारासाठी मोरगाव जेजुरी रस्त्यावरील सिद्धिविनायक हॉस्पिटलला
हलविण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेने समाजात दुःखाचे वातावरण पसरले होते तर अंत्ययात्रेत मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

No comments:

Post a Comment