मोरगावच्या तिर्थश्रेत्रात अवैध दारू धंदेवाल्याचा विळखा.! तर जोडीला चालु आहे मटका..!! मोरगाव:- महाराष्ट्रात अष्टविनायक पैकी एक प्रसिद्ध असणारे तीर्थक्षेत्र म्हणजे पुणे जिल्ह्यातील व बारामती तालुक्यातील मोरगाव या गावात रोज हजारो भक्तगण बाहेरून येत असतात या मोरगावच्या मयुरेश्वराला येऊन दर्शन घेत असतात अश्या या गावात पवित्र श्रेत्रात अवैध दारू विक्री करणाऱ्यांची संख्या वाढत आहे, त्यामुळे पिणाऱ्याची संख्या देखील वाढत चालली आहे त्यामुळे अनेक संसार उध्वस्त होत आहे तर येणाऱ्या भक्तभविकानाही या दारुड्या मुळे त्रास होत असल्याचे कळतंय मात्र पोलीस व उत्पादन शुल्क विभाग वारंवार कारवाई करून देखील हे धंदे राजरोसपणे चालू आहे, या धंदे वाल्यावर कारवाई होते त्यावेळी त्यांना दारू विक्री करणारे मूळ डीलर यांच्या वर कारवाई का होत नाही हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे, म्हणे नीरा व जेजुरी येथून ही दारू येत असून तसेच काही प्रमाणात हात भट्टी देखील विकली जात आहे, त्याच्या जोडीला मुरटी,सुपे, जेजुरी याभागातील मटका चालविणारे मालक या मोरगावात काहींना हाताशी धरून मटका चालवीत आहे याबाबत पोलीस अधिकारी यांना कल्पना दिली असून कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तर लवकरच काही महिला संघटना याबाबत वरिष्ठ लेव्हलला तक्रार करणार असल्याचे समजले असून छोट्या दारू व्यावसायिका वर कारवाई करण्यापेक्षा त्यांना दारू देणाऱ्या मालक व डीलर वर कडक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे देखील सांगितले.
Post Top Ad
Thursday, May 26, 2022
Home
ताज्या घडामोडी
मोरगाव
मोरगावच्या तिर्थश्रेत्रात अवैध दारू धंदेवाल्याचा विळखा.! तर जोडीला चालु आहे मटका..!!
मोरगावच्या तिर्थश्रेत्रात अवैध दारू धंदेवाल्याचा विळखा.! तर जोडीला चालु आहे मटका..!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment