सामाजिक न्याय विभागाकडून धामणी येथे साकव पुलासाठी १ कोटी रु.निधी मंजूर
_----_--------------------------------- पारगाव -प्रतिनिधी (पियुष गायकवाड):-
ता.३/५/२०२२-धामणी ता. आंबेगाव येथील
महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभाग तसेच मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार तसेच गृहमंत्री मा.ना.दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून धामणी हायस्कुल कडे जाणार साकव पुलासाठी ५० लक्ष रु. तसेच ,खंडोबा मंदिर कडे जाणारा ओढ्यावरील साकव पूल यासाठी ५० लक्ष रु. मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील शिवाजी विद्यालय धामणी कडे जाणाऱ्या पुलाचे काम आज प्रत्यक्षरीत्या सुरू करण्यात आले.
पंचायत समिती सदस्य मा.श्री.रवींद्र करंजखेले यांनी कुदळ मारून तर धामणी लोकनियुक्त सरपंच मा.श्री.सागर जाधव पाटील,शिरदाळे उपसरपंच मा.श्री.मयुर सरडे,मा.ग्रा.पं. सदस्य मा.आनंदा जाधव पाटील,दिलीप वाघ, पप्पू जाधव यांच्या शुभहस्ते नारळ फोडून या कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले यांनी धामणी साठी भरगोस निधी दिल्याबद्दल तसेच म्हाळसाकांत पाणी योजनेचा कुकडी प्रकल्पात समावेश केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकार तसेच गृहमंत्री मा.ना.दिलीपराव वळसे पाटील यांचे विशेष आभार मानले.
यावेळी कॉन्ट्रॅक्टर गुलाब वाघ,ग्रा.पं. सदस्य आकाश जाधव, सोसायटी संचालक दीपक जाधव,युवा सेना तालुकाध्यक्ष अक्षयराजे विधाटे, रंगनाथ करंजखेले,राहुल करंजखेले,रामदास वीर,बळी बोऱ्हाडे,सतीश पंचरास,बापू वाघ,कुशल जाधव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment