आरोटे यांना चौथास्तंभ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर राज्यातील ५६ पत्रकारांना पुरस्कार..
__________________________
*अप्रतिम मीडिया चे संपादक संचालक डॉ. अनिल फळे यांची घोषणा*
____________________________
मुंबई प्रतिनिधी:- अप्रतिम मीडिया, पुणे यांच्या वतीने बीट जर्नालिझम साठी दिला जाणाऱ्या चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार २०२२ येथील पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती चौथास्तंभ पुरस्काराचे संयोजक आणि अप्रतिम मीडिया चे संपादक, संचालक डॉ. अनिल फळे यांनी दिली.
अप्रतिम मीडिया च्या वतीने बिट जर्नलिझम साठी दिला जाणाऱ्या चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार २०२२ साठी संपूर्ण राज्यातून विविध माध्यम प्रकारांच्या प्रतिनिधींनी नामांकन केले होते. २०२०- २०२१ या दोन वर्षांमध्ये विजेत्या पत्रकारांनी केलेले विशेष वृत्तांकन विश्लेषण व पुरस्कार निवड प्रक्रियेचा भाग म्हणून वेब संवादाद्वारे एखाद्या समस्येची केलेली मांडणी इत्यादी निकष त्यासाठी लावण्यात आले होते.
त्यानुसार राजकारण, सहकार ते पर्यावरण वृत्त गटातून हे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत, अशी माहिती अप्रतिम मीडिया चे संचालक डॉ.अनिल फळे, संचालिका सौ. प्रीतम फळे, निमंत्रक सर्वश्री राहुल शिंगवी, रणजीत कक्कड, मानस ठाकूर, जगदीश माने, निशांत फळे यांनी दिली. दरम्यान, अशा प्रकारचा राज्य स्तरावरील पुरस्कार हा जिल्ह्याला आणि तालुक्यात पहिल्यांदाच मिळत आहे.
पुरस्कार विजेत्यांना मुंबई येथे लवकरच होणाऱ्या भव्य पुरस्कार वितरण समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे.
जीवन गौरव, टीव्ही न्यूज चैनल, टीम लीडर,माध्यम उद्योजकता व संपादकीय नेतृत्व, पर्यावरण वृत्त, विकास वृत्त, स्थानिक पर्यटन वृत्त, उद्योग-व्यापार वृत्त, कला-संस्कृती वृत्त, गट कृषी वृत्त, शैक्षणिक वृत्त्त, आरोग्य वृत्त, साहित्य संवाद गट, ग्रामीण विकास वृत्त, सहकार वृत्त पत्रकारिता, अध्यापन गट, स्थानिक विकास वृत्त, अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या राज्यातील ५६ पत्रकारांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
विश्वास आरोटे यांनी यापूर्वी , , दैनिक उलाढाल सार्वंमत, दैनिक लोकमंथन अशा अग्रगण्य दैनिकांमध्ये अनेक वर्ष काम केले तर दैनिक गावकरी उपसंपादक जिल्हा प्रतिनिधी सह संपादक म्हणून काम केले आहे. उत्तर महाराष्ट्र व कोकण . पश्चिम महाराष्ट्र.मराठवाडा मधील 84 वर्षाचे दैनिक गावकरी परीवारात त्यांनी तब्बल २4 वर्षं सेवा केली आहे. उत्कृष्ट आणि मुद्देसूद तसेच थेट परिणाम कारक ठरणाऱ्या बातम्या लिहिण्यात त्यांचा गेल्या अनेक वर्षापासून हातखंडा आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कार बद्दल त्यांचे सहकार शैक्षणिक राजकीय पत्रकारीता कृषी उद्योग अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment