जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांची मुस्लिम बांधवांना सदिच्छा भेट
-----------_---------------------------
आंबेगाव तालुका प्रतिनिधी:-ता.३/५/२०२२
मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद च्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी घोडेगाव, पिंपळगाव, अवसरी, लोणी, इत्यादी गावातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा भेट घेतली.
समाजातील काही व्यक्ती धर्मा - धर्मामध्ये बेताल वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करतात, यापासून आपण सर्वांनी सावध राहावे, कोणत्याही बेताल वक्तव्याला बळी पडू नका, एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले. मुस्लिम बांधवांनी ही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकाराची भावना नेहमी राहील असे सांगितले. मुस्लिम समाजातील बांधवांनी आलेल्या सर्व हिंदू बांधवांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला.या यावेळी लोणी येथील मशानभुमी च्या संरक्षक भिंतीसाठी दहा लाख रुपये मंजूर असल्याचे त्यांनी सांगितले. वाढीव खर्चासाठी ही प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. प्रत्येक गावात गावातील सरपंच, उपसरपंच व प्रत्येक गावातील कार्यकर्ते हजर होते. लोणी येथे मुस्लिम बांधवांतर्फे नजीर भाई मुलानी यांनी विवेक वळसे पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. लोणी धामणी परिसरातील म्हाळसाकांत पाणी योजनेचा लवकरच गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्यामार्फत प्रश्न मार्गी लावू असे त्यांनी सांगितले. यावेळी लोणीच्या सरपंच उर्मिला ताई धुमाळ, उपसरपंच अनिल पंचरास, समाज भूषण कैलासराव गायकवाड, माजी सरपंच दिलीप शेठ वाळुंज, निवृत्त अधिकारी प्रकाश वाळुंज, माजी सरपंच उद्धवराव लंके, शरद सहकारी बॅंकेचे संचालक अशोक पाटील, जिल्हा परिषद गटातील सरचिटणीस बाळशीराम वाळुंज, पोलीस पाटील संदीप आढाव, तंटामुक्ती चे माजी अध्यक्ष संतोष पडवळ, हे समाजातील कार्यकर्ते कासम भाई मुलानी, राजू मुलानी, नजीर भाई मुलानी, सरवर मुलानी. साकिब मुलानी, गणी सय्यद , मुलानी सर, मौलाना व इतर कार्यकर्ते हजर होते. मंचर पोलीस स्टेशन च्या वतीने रमजान ईद च्या निमित्ताने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश होडगर, बीट अंमलदार तानाजी हागवणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
.
No comments:
Post a Comment