*घाडगेवाडीत संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी..*
बारामती:- शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज घाडगेवाडी येथे राजमाता जिजाऊ चौकात संभाजी ब्रिगेड'च्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड बारामती तालुका अध्यक्ष तुषार तुपे, तालुका संघटक विशाल भगत, घाडगेवाडी शाखाध्यक्ष अभिजीत बळीप, उपाध्यक्ष कार्तिक काकडे, सचिव निलेश फडतरे, खजिनदार प्रशांत काकडे, संघटक अमरजीत तुपे, सतीश तुपे, अक्षय चव्हाण, हरिश्चंद्र शिंदे, अमित चव्हाण, लालासो तुपे, शशिकांत फडतरे, अमोल साबळे, पुंडलिक शिंदे, दत्तात्रय वाघ, सुर्यकांत काकडे, हिंदुराव घाडगे, दत्तात्रय चव्हाण, रोहित साबळे, माणिकराव घाडगे आदी शंभुप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.
No comments:
Post a Comment