अबब..बारामतीत लाच घेण्याऱ्याचे प्रमाण वाढतेय, लाचप्रकरणी पोलिसाला अटक:होमगार्डवर गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 23, 2022

अबब..बारामतीत लाच घेण्याऱ्याचे प्रमाण वाढतेय, लाचप्रकरणी पोलिसाला अटक:होमगार्डवर गुन्हा दाखल..

अबब..बारामतीत लाच घेण्याऱ्याचे प्रमाण वाढतेय, लाचप्रकरणी पोलिसाला अटक:
होमगार्डवर गुन्हा दाखल..
बारामती:-बारामती विकसित होत असताना मात्र अधिकारी व कर्मचारी वर्गाचं जास्तच वजन वाढत असताना त्यांना आपल्या कामासाठी वजनदार आर्थिक वजन द्यावे लागत असल्याचे कळतंय तर  अनेक शासकीय कार्यालयात सर्वसामान्य लोकांची होणारी ससेहोलपट आर्थिक देवाण घेवाण मुळे मार्गी लागतात ही भोळी आशा बाळगत कामे करून घेतली जातात तर आजपर्यंत बारामतीत अनेक जण लाचखोरीचे शिकार झाले असून पुन्हा एखादा  बारामती शहर पोलिस ठाण्यातील हवालदारासह
होमगार्ड एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. हवालदार अण्णासाहेब नामदेव उगले (वय ४९) व होमगार्ड सनी शामराव गावडे या दोघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील उगले यांना अटक करण्यात आली आहे. एका वॉरंटमध्ये तक्रारदाराला अटक न करण्यासाठी एक हजार रुपयांच्या लाचेची
मागणी त्यांनी केली होती.तक्रारदाराने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार,वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी होमगार्ड सनी गाढवे याने तक्रारदाराकडे १ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ८०० रुपये देण्याचे ठरले होते.५ व ६ मे रोजी एसीबीने या प्रकाराची पडताळणी केली होती. या कामी उगले याने लाच मागणीला प्रोत्साहन दिल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार सोमवारी (दि.२३) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.शासकिय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन या विभागाचे पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment