आंबेगाव तालुक्यात भोंगे न लावता सकाळची झाली अजान..
आंबेगाव तालुका प्रतिनिधी:- ता.४/५/२०२२ मंचर,घोडेगाव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ४तारखेच्या अल्टिमेट नंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, पोलिस यंत्रणा सज्ज असून आंबेगाव तालुक्यातील मंचर घोडेगाव येथे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिर व मशीद वरील भोंगे परवानगी घेऊन वाजवण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले होते. त्यानुसार मंचर घोडेगाव येथील मशिदीवरील पहाटेची पहिली अजान ही भोंग्या विना पठण करण्यात आली. यावेळी मशिदी बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक स्थळांच्या तपासणीसाठी गुड मॉर्निंग पथक तैनात करण्यात आले होते. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. याचीही काळजी घेण्यात येत होती. गुड मॉर्निंग पथकामध्ये साधारणपणे दोन पथके तयार करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश होडगर व साहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली. पहाटेपासून पोलीस विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अशी माहिती खेड विभागाचे विभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिली. मंचर येथील मशीदीत लाऊड स्पीकर विना अजान झाल्याचे पोलीस निरीक्षक होडगर यांनी सांगितले. घोडेगाव येथील ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी घोडेगाव येथे दोन मशिदीमध्ये व शिनोली येथे एका मशिदीमध्ये भोंग्या विना अजान झाली, असल्याचे सांगितले. आंबेगाव तालुक्यात पहाटेच्या अजान वेळेस भोंगे लावण्यात आले नाही. तसेच इतर वेळेसही आवाजाची मर्यादा पाळतअजान झाली.
No comments:
Post a Comment