सदनिका देतो म्हणून वेळोवेळी उकळले पैसे मंचर येथील घटना
------------------------------------
( कैलास गायकवाड)
आंबेगाव ( पुणे)तालुका प्रतिनिधी ता.२८/५/२०२२:-
मंचर तालुका आंबेगाव येथील बिल्डींग मधील सदनिकेचा ताबा दीड वर्षात देतो असे सांगून, सहा लाख ५२ हजार रुपये घेतले. येथील संकल्प रेसिडेन्सी, ए विंग तिसरा मजला एक बी एच के.५४० चौरस फूट, किंमत रुपये १० लाख ८०हजार, मंचर येथे सदनिकेचा ताबा घेतो म्हणून सदनिका बुक करून सात वर्षे होऊन गेलीत, तरी अजुन ताबा देत नाही म्हणून,
संकल्प कन्ट्रक्शन चे लहू रामचंद्र बागल वय वर्ष ५२,व त्यांची पत्नी संजीवनी लहू बागल वय वर्षे ४८ यांनी यांनी सदर बाबत कोणताही करार न करता माझी फसवणूक केली. व मी दिलेल्या रकमेचा अपहार केला आहे. अशा आशयाची फिर्याद ज्ञानेश्वर साईबाबा मंचरे वय वर्ष ४2 धंदा नोकरी सध्या राहणार गोरे वस्ती वाघोली तालुका हवेली. ( मूळ राहणार जारकरवाडी,तालुका आंबेगाव,जिल्हा पुणे. यांनी मंचर पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे.गुन्हा घडल्याचे ठिकाण गौरव कलेक्शन मंचर,तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे.३/९/२०१४ते ७/५/२०२२ असा गुन्ह्याचा कालावधी असून, पैसे चेकद्वारे आणि आरटीजीएस द्वारे दिले आहेत. गुन्हा रजिस्टर नंबर २३०/२०२२ भा.द.वि.कलम४२०,४०६,३४ सह महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट स ॲक्ट ३(2),४(१]१३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक थाटे मंचर पोलीस स्टेशन करत आहे.
No comments:
Post a Comment