*स्ट्रीट लाईटच्या पोलवरती पथदिवे बसवा अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतिने आंदोलन*
बारामती:- नगरपरिषद वाढीव हद्दीमधील जळोची,रूई तांदुळवाडी परिसरात गेल्या 8 ते 9 महीन्या पासुन स्ट्रीट लाईटचे नुसतेच पोल उभा केलेले आहेत, परंतु त्यावर अद्याप पथदिवे लावले नाहीत, या परिसरातील लोक रोज वाट बघत आहेत आज रस्त्यावरती उजेड पडेल उद्या पडेल, परंतु नगरपालिका प्रशासन जाणुन बुजुन या गोष्टी कडे दुर्लक्ष करीत आहे, आज राष्ट्रीय समाज पक्षाकडून लेखी पञ देण्यात आले आहे,लवकरात लवकर या उभा केलेल्या पोलवरती पथदिवे बसवा अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाकडून आंदोलन केले जाईल असे अँड.अमोल गुलाबराव सातकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment