तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने ठरविले डाक अदालत घेण्याचे.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 30, 2022

तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने ठरविले डाक अदालत घेण्याचे..

तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने ठरविले डाक अदालत घेण्याचे..                                            पुणे:-डाक अदालत देशामधील पोस्टाची सेवा ही सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये अपरोक्षपणे पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करून प्रभावित केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचे प्रयत्न करते. ही सेवा देतांना, संभाषणामध्ये / पत्रव्यवहारामध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्धल तक्रार करण्याची वेळ येते. हया तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडविण्याचा प्रयत्न करतात.द्वारा दिनांक 23.06.2022 रोजी पोस्टमास्तर जनरल, पुणे रीज़न पुणे पोस्टमास्तर जनरल, पुणे रीज़न पुणे यांच्या कार्यालयामध्ये 64 वी डाक अदालत आयोजित करीत आहेत.पोस्टाच्या कार्यपद्धती विषयी किंवा कामकाजाबद्धल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवडयांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तु, पार्सल,बचत बैंक व मनिऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीला सह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवीली असेल त्याचे नांव व हुदद् इत्यादी. संबंधितांनी डाक सेवे बाबतची आपली तक्रार श्री. आय. डी. पाटील,सहायक पोस्टमास्टर जनरल, पोस्टमास्टर जनरल चे कार्यालय, पुणे क्षेत्र, पुणे 411001 यांचे नावे दोन प्रती सह दिनांक 10.06.2022 पर्यंत अथवा तत्पुर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाहीं.असे 
पोस्टमास्टर जनरल पुणे रीज़न पुणे यांनी पत्राद्वारे कळविले.

No comments:

Post a Comment