लाखनगाव येथे १५ हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, May 27, 2022

लाखनगाव येथे १५ हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार..

लाखनगाव येथे १५ हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार..
 (कैलास गायकवाड)आंबेगाव तालुका प्रतिनिधी ता.२६/५/२०२२:- लाखनगाव तालुका आंबेगाव येथील सारंग बाबा गायरान ३०एकर क्षेत्रात सामाजिक वनीकरण विभाग व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच प्राजक्ता रोडे पाटील त्यांनी दिली. पाऊस कळा सुरु झालेनंतर जांभूळ, मोहा, करंज,  बेल, कांचन,  आपटा, चिंच, सिताफळ, कडुलिंब, पिंपळ, आंबा असे ११हजार ११रोपांची वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
 ग्रामपंचायतीच्या वतीने पाच एकर क्षेत्रात तीन हजार रोपांची वृक्षारोपण करता येणार आहे. सर्व ठिकाणी खड्डे खणण्याचे काम सुरू आहे.
 सामाजिक वनीकरण विभाग आंबेगाव च्या वनक्षेत्र अधिकारीजयश्री पवार, वनपाल सारिका बुट्टे, संतोष बिराजदार, वनमजुर सय्यद, निरगुडसर चे माजी उपसरपंच रामदास वळसे-पाटील, यांनी भेट देऊन पाहणी करून कामाचा आढावा घेतला.  या वेळेस खरेदी-विक्री संघाचे संचालक मनोज कुमार रोडे, शिरीष कुमार रोडे, संतोष टाव्हरे,  केर भाऊ गाडगे उपस्थित होते. गृहमंत्री  दिलीप वळसे- पाटील व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे -पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली,
 दोन वर्षापूर्वी ग्रामपंचायतीने गवळीबाबा कार्यक्षेत्रातील जागेत विविध प्रकारच्या झाडाच्या जातीचे वृक्ष रोपण केले होते.
 असे सरपंच प्राजक्ता रोडे पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment