*ओंकार जाधव मित्र परिवाराच्या वतीने वन्यजीव पाणवठ्यासाठी टँकरने पाणीपुरवठा,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते टँकरचे पूजन.* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 14, 2022

*ओंकार जाधव मित्र परिवाराच्या वतीने वन्यजीव पाणवठ्यासाठी टँकरने पाणीपुरवठा,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते टँकरचे पूजन.*

*ओंकार जाधव मित्र परिवाराच्या वतीने वन्यजीव पाणवठ्यासाठी टँकरने पाणीपुरवठा,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते टँकरचे पूजन.*

*बारामती:- तालुक्यातील वनक्षेत्रात  असलेले सर्व पाणवठे पाण्याने तुडुंब भरण्यासाठी ओंकार जाधव मित्र परिवाराच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.या कार्याचा शुभारंभ आज विद्या प्रतिष्ठान बारामती येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.पूजन केल्यानंतर पाण्याचे टँकर वनक्षेत्राकडे रवाना करण्यात आले.*

*उन्हाच्या तीव्रतेमुळे वनक्षेत्रातील पाणवठे वेगाने कोरडे पडतं आहे. वन्यजीवांना पिण्यासाठी पाणी कमी पडत आहे.वन्यजीवांना तहान भागावी व पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता ओंकार जाधव मित्र परिवाराच्या वतीने बारामती तालुक्यातील वनक्षेत्रातील सर्व पणावठ्याना टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे.वनाधिकारी लोणकर व मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पांणवठ्याना पाणी पोहोच केले जाणार आहे.*

*यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते ओंकार जाधव यांच्या सामाजिक व राजकीय कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.तसेच सामाजिक कार्यकर्ते सयाजी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.*

No comments:

Post a Comment