बारामतीत स्मृती शताब्दी वर्षानिमित्त शाहुराजांना आदरांजली
बारामती दि.६: आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षा निमित्त शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी सकाळी ठिक दहा वाजता बहुजन समाजातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून शंभर सेकंद जागेवरती स्तब्ध उभं राहत छत्रपती शाहूराजां प्रति कृतज्ञता व्यक्त करत आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या स्मृतींना उजाळा देत असताना.इथून पुढच्या काळात जर आपल्या देशाला महासत्ता बनवायचे असेल तर फुले-शाहू आंबेडकरांच्या विचारा शिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही.असे प्रतिपादन बसपा नेते काळुराम चौधरी यांनी केले.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम अहिवळे यांनी केले.
दरम्यान या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,माजी विरोधी पक्षनेते सुनील सस्ते,माजी नगरसेविका आरती शेंडगे,प्रा.सेजल अहिवळे,सामाजिक कार्यकर्ते बबलू जगताप,संजय मोरे,मा.प सवाणे गुरुजी,रामभाऊ मोरे,धिरज भोसले,भूषण ढवाण,देविदास गायकवाड, निलेश जाधव,रितेश गायकवाड,रणधीर चव्हाण,विजय लोंढे,सौरवी अहिवळे,राजश्री अहिवळे,प्रेरणा अहिवळे यांच्यासह विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे गौतम शिंदे,ॲड.सुशिल अहिवळे,गजानन गायकवाड,प्रा.रमेश मोरे,सोमनाथ रणदिवे,नितीन शेलार,परीक्षित चव्हाण,मंगलदास निकाळजे,चंद्रकांत भोसले,विश्वास लोंढे,सिद्धार्थ शिंदे,सुशिल भोसले,संतोष जगताप,विकास जगताप,सचिन जगताप,चेतन शिंदे,अक्षय मेमाणे,सिद्धार्थ सोनवणे,भास्कर दामोदरे,संजय सोनवणे व आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment