दिव्यांग (ऑटीझम) विद्यार्थ्याचे उन्हाळी शिबीर संपन्न '
वाकड:- दि. ४ मे ते २७ मे २०२२ या २१ दिवसांच्या कालावधी मध्ये अभिसार फाउंडेशन वाकड येथील शाळेत दिव्यांग (ऑटीझम)
विद्यार्थ्याचे शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबीरामध्ये एकूण ३० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. या शिबीरामध्ये प्रत्येक दिवसाच्या वेगवेगळया अॅक्टीव्हीटी घेण्यात
आल्या. त्यामध्ये स्पोटर्स अॅक्टीव्हीटी, योगा, आर्टस अॅन्ड क्राप्ट स्टोन पेन्टींग, फन गेम, नृत्य थेरपी, मेमरी गेम, कुकींग मुझ्यीक या
अॅक्टीव्हीटी घेण्यात आल्या. यामुळे विद्यार्थ्याच्या मध्ये आत्मविश्वास वाढला, फाईन मोटार स्कील वाढीस मदत झाली. दि. २६ मे रोजी १ दिवसांचे निवासी शिबीर घेण्यात आले. सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र व रिपोर्ट कार्ड देण्यात आले.या शिबीराचे नियोजन सौ. प्राची पुराणीक, प्रिया बालचंद्र, सौ.कल्पना मोहिते, सुनिता आवटे, डॉ. रविना रणदिवे, वैष्णवी जगताप व अभिसार फाउंडेशनच्या सर्व स्टाफ व कर्मचारी यांनी केले.
No comments:
Post a Comment