अंगणवाडी सेविका कै. मंगल विलास खंडागळे यांचे दुःखद निधन:
भिमानगर :(विशेष प्रतिनिधी):- भिमानगर ता.माढा जि.सोलापूर येथील अंगणवाडी सेविका कै. मंदाकिनी विलास खंडागळे वय:56 यांचे काल दि.17.05.2022 रोजी संध्याकाळी 6.30वा.सोलापूर येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्याच्या पश्चात 1मुलगा 3 मुली असा परीवार आहे. गेल्या 25वर्षापासून भिमानगर (उजनी) या कोंढारपट्टा भागात अंगणवाडी सेविका म्हणून कार्य करीत होत्या. लहान बालकांचे बडबड गीते त्यांनी मुलांना संस्कारक्षम आणि प्रसन्न वातावरण निर्माण केले. त्यांना बाराखडी शिकवली .उजळणी लिहिण्यासाठी अक्षरओळखाची सुरूवात लहान मुलांना संस्कारक्षम आणि प्रसन्न वातावरण निर्माण केले. अविरतपणे मुलामुलींना शैक्षणिक समुपदेशन करणारे दुत म्हणून नव्या पिढीला त्या आदर्श माता होत्या. समाजसेवक अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजेते प्रा.गोरख साठे सर बारामती यांच्या त्या सासुबाईं होत्या. त्याच्या दुःखद निधनाने सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे
No comments:
Post a Comment