----------------------------------
आंबेगाव ( पुणे ) प्रतिनिधी:-
ता.१३/५/२०२२ कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. येथे माळुंगे फाट्याजवळ दीड लाख अंडी घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला.
गुरुवार दिनांक १२ रोजी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
अंड्याचा ट्रक जी. जे.०५ ए. व्ही ६८०४ हा ट्रक कर्नाटक व रुमाल भरून सुरत या ठिकाणी जात असताना पुणे-नाशिक महामार्गावर गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे स्मशानभूमी जवळ गाडी पलटी झाली. गाडी पलटी होतात ट्रक ड्रायव्हर ने पळ काढला.गाडी चालवते वेळी ड्रायव्हर दारूच्या नशेत असल्याचे, ट्रकचा क्लीनर रामू यांनी सांगितले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. जवळपास पाच ते सहा लाख रुपयांचे अंड्याचे नुकसान झाल्याचे रामू यांनी सांगितले.अपघाताची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. पुढील तपास चालू आहे
No comments:
Post a Comment