अबब.. पालखी मार्गात टक्केवारी घेत असल्याचे धक्कादायक आरोप?वादग्रस्त न्यूज ने वेळोवेळी केली होती प्रांत अधिकारी यांच्याकडे तक्रार..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 7, 2022

अबब.. पालखी मार्गात टक्केवारी घेत असल्याचे धक्कादायक आरोप?वादग्रस्त न्यूज ने वेळोवेळी केली होती प्रांत अधिकारी यांच्याकडे तक्रार..!

अबब.. पालखी मार्गात टक्केवारी घेत असल्याचे धक्कादायक आरोप?वादग्रस्त न्यूज ने वेळोवेळी केली होती प्रांत अधिकारी यांच्याकडे तक्रार..!                         बारामती:- गेल्या अनेक महिन्यापासून वेळोवेळी अनेक लोक पालखी मार्गात टक्केवारी घेत असल्याचे सांगत होते पण पुढे येण्यास धजावत होते कारण तक्रार केलीच तर आमचा मोबदला मिळण्यास आणखी अडचण येऊ शकते, तर याठिकाणी काही राजकिय पुढारी,काही एजंट यांच्या मार्फत ही टक्केवारी घेतली जात असल्याचे प्रांतअधिकारी यांना सांगण्यात आले याबाबत प्रांत अधिकारी यांनी तश्या सूचना तेथील कर्मचारी यांना दिल्या होत्या,तर अनेक वेळा याबाबत वादग्रस्त न्यूजने बातम्या प्रसिद्ध केल्या असून याबाबत नार्को टेस्ट ची देखील मागणी करणार असल्याचे सांगितले, या ठिकाणी कार्यरत असणारे रिटायर्ड अधिकारी व इतर अधिकारी मार्फत टक्केवारी घेत असल्याचे समजत होतं?तसे अनेकदा बोलताना ऐकावयास येत होतं,पण आज कहरच झाला  उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौर्यावर आले होते, काटेवाड़ी गावात एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान एका ग्रामस्थाने संत तुकाराम महाराज पालखी मार्गात घर गेलेय पण त्याचा मोबदला मिळत नसल्याची तक्रार केली.त्यावर तोडगा काढण्यासाठी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना अजित पवार सुचना देत
होते.याच दरम्यान, सभेत उपस्थित असलेल्या एका ग्रामस्थाने पालखी नुकसान भरपाई देण्यासाठी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे दोन
टक्के कमिशन घेत असल्याची तक्रार केली. भर सभेत असा आरोप झाल्याने उपस्थितांमध्ये गोंधळाचे वातावरण झाले. त्यावर अजित पवार यांनी मात्र, कपाळाला हात लावत आश्चर्य व्यक्त
केले. पण त्याचवेळी स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील यांना संबंधित शेतक-याची तक्रार दूर करण्याची सुचना केली.तसेच प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी अनेक शेतक-यांकडून
कोट्यवधी रुपये खाल्ले असल्याचा गंभीर आरोप देखील या शेतकर्याने केला आहे.त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार याकडे गांभीर्याने लक्ष
देणार का ? या प्रकरणाची चौकशी होणार का ? असा प्रश्न आता शेतक-यांकडून उपस्थितीत केला जात असून याठिकाणी काम करणाऱ्या काही अधिकारी यांची नार्को टेस्ट झाल्यास सत्य बाहेर येईल असेही दबक्या आवाजात चर्चा चालू होती.

No comments:

Post a Comment