भीमाशंकर साखर कारखान्याच्या १३ लाख ४१ हजार पोत्यांचे पुजन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, May 6, 2022

भीमाशंकर साखर कारखान्याच्या १३ लाख ४१ हजार पोत्यांचे पुजन..

भीमाशंकर साखर कारखान्याच्या १३ लाख ४१ हजार पोत्यांचे पुजन..
***********************
 आंबेगाव तालुका (प्रतिनिधी कैलास गायकवाड):- ता.५/५/२०२२ दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२१-२२ मधील उत्पादीत १३ लाख ४१ हजार पोत्याचे पुजन कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील साहेब यांचे हस्ते करण्यात आले. 
या कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर गावडे, संचालक प्रदीप वळसे पाटील, अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, दगडू मारुती शिंदे, शांताराम हिंगे, बाळासाहेब थोरात, आण्णासाहेब पडवळ, भगवान  बो-हाडे, अक्षय काळे, ज्ञानेश्वर अस्वारे, रमेश लबडे, किसन उंडे, कल्पना गाढवे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, प्रोसेस मॅनेजर किशोर तिजारे, सचिव रामनाथ हिंगे, चिफ अकौंटंट राजेश वाकचौरे, कामगार कल्याण अधिकारी चंद्रशेखर मगर, स्टोअर किपर अनिल बोंबले, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे तसेच अधिकारी व कर्मचारी हजर होते. 
गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये कार्यक्षेत्र व परिसरामधील आजअखेर ११ लाख ७८ हजार मे.टन ऊसाचे गाळप करुन सरासरी ११.३८ टक्के साखर उता-याने १३ लाख ४१ हजार साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. सहविज निर्मिती प्रकल्पाद्वारे आजअखेर ७ कोटी ८४ लाख युनिट उत्पादन करून कारखाना वापर वजा जाता ४ कोटी ३४ लाख युनिट वीज वितरण कंपनीला निर्यात केली आहे. कारखान्याचा २०२१-२२ चा गळीत हंगाम चालू असून कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली गळीत हंगाम यशस्वीरित्या पुर्णत्वाकडे आलेला असून नोंद असलेल्या शिल्लक उसाचे गाळप करून गाळप हंगामाची सांगता होईल अशी माहिती  कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
-----------------------------------------

No comments:

Post a Comment