पत्रकार संतोष जाधव यांच्या पाठपुराव्याला यश..! जुनी कचेरी ते भिगवण चौकापर्यंत व शिवाजी चौक ते तांदूळवाडी वेस चौक या पेठेमध्ये महिलांना व ग्राहकांच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालयाची उभारणी लवकरच..!! बारामती:- दि. १/१२/२०२१ जुनी कचेरी ते भिगवण चौकापर्यंत व शिवाजी चौक
ते तांदूळवाडी वेस चौक या पेठेमध्ये ग्राहकांची सतत येरोजी मा. महेश रोकडे मुख्याधिकारी बारामती नगरपरिषद, बारामती यांना लेखी निवेदन पत्रकार संतोष जाधव यांनी दिले होते त्यामध्ये महिला व ग्राहकांसाठी सार्वजनिक शौचालयाची उभारणी करावी, जुनी कचेरी ते भिगवण चौकापर्यंत व शिवाजी चौक ते तांदुळवाडी वेस चौक या पेठेमध्ये ग्राहकांची सतत ये-जा व गर्दी असते. बाहेरुन येणाऱ्या महिला भगिनी यांच्यासाठी
दुकानदारांनी स्वच्छता गृहाची व्यवस्था करणे गरजेचे होते. परंतु तसे दिसत नसल्याने बारामती नगरपरिषदेने तात्काळ सदरहू ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहाची सोय करावी अशीच मागणी काही वर्षापूर्वी आमरण उपोषण करुन महिलांनी केली होती. परंतु तात्पुरते आश्वासन देवून
अद्यापपर्यंत या भागात स्वच्छता गृहाची सोय झालेली नाही.तरी तात्काळ या अर्जाची दखल घेवून स्वच्छतागृहाची सोय करावी अन्यथा दि. १२ डिसेंबर २०२१ रोजी आपल्या कार्यालयासमोर नाईलाजास्तव उपोषणास बसावे लागेल असे पत्र बारामती नगर परिषद मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व पोलीस स्टेशन यांना देण्यात दिले होते त्याची नोंद घेऊन दिनांक ०१/१२/२०२१ रोजीच्या उपरोक्त पत्रान्वये जुनी कचेरी ते भिगवण चौकापर्यंत व शिवाजी चौक
ते तांदूळवाडी वेस चौक या पेठेमध्ये ग्राहकांची सतत ये जा व गर्दी असते, बाहेरुन येणा-या महिला भगिनी यांच्यासाठी दुकानदारांनी स्वच्छता गृहाची व्यवस्था करणे गरजेचे होते, परंतु तसे दिसत नसल्याने बारामती
नगरपरिषदेने तात्काळ सदरहू ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहाची सोय करावी अशीच मागणी काही वर्षापूर्वी आमरण उपोषण करुन महिलांनी केली होती, परंतु तात्पुरते आश्वासन देवून अद्यापर्यंत या भागात स्वच्छता गृहाची सोय
झालेली नाही, तरी तात्काळ स्वच्छतागृहाची सोय करावी अन्यथा दिनांक १२/१२/२०२१ उपोषणास बसणार असल्याचे कळविलेले आहे.
बारामती नगरपरिषद मा. विशेष सभा दिनांक ०७/१२/२०२१ मध्ये शहरात सार्वजनिक शौचालय बांधणे बाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार बारामती नगरपरिषद जुनी कचेरी ते भिगवण चौकापर्यंत व
शिवाजी चौक ते तांदूळवाडी वेस चौक या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे करिता जागेचा सर्वे करुन जागा उपलब्ध होताच सदर ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याची पुढील कार्यवाही नगरपरिषदेमार्फत करण्यात
येईल. तरी आपले दिनांक १२/१२/२०२१ रोजीचे नियोजीत उपोषण मागे घेण्याबाबत आपणास विनंती करण्यात येत आहे असे लेखी पत्र महेश रोकडे मुख्याधिकारी बारामती नगरपरिषद, बारामती यांनी दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले होते व जागा सर्व्हे चालू असल्याने आत्ता रेडिमेड शौचालय देखील आणून ठेवले असून लवकरच जागा सर्व्हे करून बसविण्यात येईल तसेच आपणही जागा सुचवा असे पत्रकार संतोष जाधव यांना सांगण्यात आले असून लवकरच जुनी कचेरी ते तीन हत्ती चौक व तांदुळवाडी वेस चौक ते शिवाजी चौक या रस्त्यावर महिलांना व ग्राहकांना सोयीचे असे सार्वजनिक शौचालय लावण्यात येईल त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा चालू आहे.
No comments:
Post a Comment