राष्ट्रीय समाज पक्ष पुणे जिल्हा सरचिटणीस पदी भिगवण येथील संतोष कोकरे यांची निवड... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, May 13, 2022

राष्ट्रीय समाज पक्ष पुणे जिल्हा सरचिटणीस पदी भिगवण येथील संतोष कोकरे यांची निवड...

राष्ट्रीय समाज पक्ष पुणे जिल्हा सरचिटणीस पदी भिगवण येथील संतोष कोकरे यांची निवड...                                                           पुणे:- येथील पत्रकार भवन येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या िविध पदाधिकार्‍यांच्या निवडी प्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुणे जिल्हा सरचिटणीस पदी भिगवण येथील उद्योजक संतोष कोकरे यांची निवड करण्यात आली सदर निवड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते पक्षाचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर जी सलगर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष  एडवोकेट संजय माने पाटील यांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोपने पक्षाचे युवा आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजित पाटील आदी उपस्थित होते श्री संतोष कोकरे पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांचा भिगवण येथे कृषी निविष्ठा विक्री केंद्र असून गेल्या वीस वर्षापासून चांगल्या प्रकारची सेवा ते शेतकऱ्यांना देतात तसेच शेतकऱ्यांना उत्तम मार्गदर्शन करतात श्री कोकरे यांचा भिगवण परिसरात तसेच करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात चांगला जनसंपर्क आहे पक्षाला भिगवण परिसरातून चांगले नेतृत्व मिळाल्यामुळे आगामी काळात पक्ष पुणे जिल्ह्यात प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

No comments:

Post a Comment