खेड मांदळेवाडी मुक्कामी एसटी बस सेवा सुरु करण्याची मागणी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 19, 2022

खेड मांदळेवाडी मुक्कामी एसटी बस सेवा सुरु करण्याची मागणी...

खेड मांदळेवाडी मुक्कामी एसटी बस सेवा सुरु करण्याची मागणी...                               निरगुडसर : प्रतिनिधी : प्रतिक अरुण गोरडे.
दिः१९/०५/२०२२.
_________________________
 एसटी महामंडळाची नारायणगाव आगाराची मंचर ते मांदळेवाडी हि मंचरहून सुटणारी टपालगाडी व खेड आगाराची सायंकाळी सहावाजता सुटणारी खेड मांदळेवाडी मुक्कामी एसटी बस सेवा सुरु करण्याची मागणी वडगावपीरच्या सरपंच मिरा संजय पोखरकर व मांदळेवाडीचे सरपंच कोंडीभाऊ आदक व सदस्या ज्योती गोरडे व शशिकला पालेकर पाटील यांनी केली आहे. कोरोना काळात एसटीचा प्रवास बंद झाला होता.पण कोरोनानंतर व एसटी कर्मचार्यांच्या संपानंतर अनेक ठिकाणी सध्या एसटीचा प्रवास पुन्हा एखदा सुरु झाला आहे.मंचरहून मांदळेवाडीला दुपारी येणारी टपाल एसटी बस बंद असल्याने ऐन उन्हाळयात प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.कारण हि एसटी बस बंद असल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच खेडवरून सांयकाळी साडेपाच सहा वाजता एकमेव असणारी मांदळेवाडी मुक्कामी असणारी एसटी बस बंद असल्याने पुणे, भोसरी,चाकण,मुंबई,नवी मुंबई या ठिकाणाहून येणार्यां प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.शिवाय खेडवरून हि एसटी बस राक्षेवाडी,जरेवाडीफाटा, गूळाणी,वाकळवाडी,वाफगाव,टाकळकरवाडी, चिंचबाईचीवाडी,शिरदाळेफाटा,लोणी,वडगावपीर मार्गे मांदळेवाडी येथे मुक्कामी येत होती त्यामूळे वरील गावांच्या प्रवाशांची चांगली सोय होत होती.तरी एसटी महामंडळाने वरील दोन्ही एसटीबस त्वरीत सुरू कराव्यात आशी जोरदार मागणी मांदळेवाडीच्या उपसरपंच निकिता आदक, माजी उपसरपंच माधूरी आदक, पिरभाऊ आदक, ग्रामपंचायत सदस्य फकिरा मांदळे, नवनाथ मांदळे व विद्यार्थी-ग्रामस्थांनी केली आहे. 

# चौकट # 

मांदळेवाडी येथील ग्रामपंचायतीने एसटी महामंडळाच्या मुक्कामी असणार्या कर्मचार्यांसाठी शौचालयाची चांगली सोय केली आहे. नजकिच्या काळात जातीजास्त चांगल्या सोयी इथे उपलब्ध करून देण्यात येतील असे ग्रामस्थांच्या वतीने सुभाष बोत्रे,कैलास मांदळे,ज्ञानेश्वर मांदळे,बापू आदक,भाऊसाहेब बगाटे यांनी सांगितले.

 

No comments:

Post a Comment