आंबेगाव तालुका माध्यामिक शाळा सेवकांची सहकारी पतसंस्थेचे कामकाज कौतुकास्पद व अभिमानास्पद.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, May 8, 2022

आंबेगाव तालुका माध्यामिक शाळा सेवकांची सहकारी पतसंस्थेचे कामकाज कौतुकास्पद व अभिमानास्पद..

आंबेगाव तालुका माध्यामिक शाळा सेवकांची सहकारी पतसंस्थेचे कामकाज कौतुकास्पद व अभिमानास्पद..                                                  निरगुडसर प्रतिनिधी-प्रतिक अरुण गोरडे:- 
दि :०८/०५/२०२२. आंबेगाव तालुका माध्यामिक शाळा सेवकांची सहकारी पतसंस्थेचे कामकाज कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. कारण या पतसंस्थेमध्ये आकस्मित व इतर कर्ज तात्काळ दिले जाते. बॅकांचा विचार करता पतसंस्था फारच महत्वाची आहे.संस्थेच्या चांगल्या कामकाजामुळे आतापर्यंत ऑडिट वर्ग ' अ ' मिळाला आहे. असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष साहेबराव बोरकर यांनी केले आहे. निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील प.ज.नेहरू माध्यमिक व द.गो.वळसे पाटील उच्च माध्यामिक विद्यालयात आयोजित केलेल्या संस्थेच्या '' ४३ '' व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोरकर बोलत होते.यावेळी संस्थेच्या विविध शाखाचे सर्व संचालक,सभासद,प्राचार्य,मुख्याध्यापक उपस्थित होते.यावेळी विविध शाखांचे मुख्याध्यापक व प्राचार्य तसेच आजी माजी संचालक व सेवा निवृत कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला.संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन सचिव प्रकाश तापकीर व सहसचिव तानाजी रोकडे यांनी केले. सूत्रसंचालन संचालक प्रा.अरुण गोरडे यांनी केले. आभार संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी मानले. _________________________

No comments:

Post a Comment