बारामती मेडद कऱ्हानदीच्या पात्रा लगत १३ मोरी परिसरात तयार होतेय गावठी दारू..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 31, 2022

बारामती मेडद कऱ्हानदीच्या पात्रा लगत १३ मोरी परिसरात तयार होतेय गावठी दारू..!

बारामती मेडद कऱ्हानदीच्या पात्रा लगत १३ मोरी परिसरात तयार होतेय गावठी दारू..!
बारामती:- बारामती शहर व तालुक्यातील अनेक गावात अवैध दारू विकणार्यावर कारवाई होत असताना  बारामती मोरगाव रोड मेडद गावामध्ये कऱ्हा नदीच्या लगत 13 मोरी च्या आसपास मोठ्या प्रमाणावर गावठी दारू(हात भट्टी)तयार केली जात असल्याचे कळतंय अनेक वर्षापासून हा प्रकार रात्री-अपरात्री सुरू असल्याचे सांगण्यात येते. संबंधित लोक हे मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारूच्या बॅरलमध्ये मोठ्या
प्रमाणावर दारू काढत असल्याचे देखील
सांगण्यात येत आहे,कितीजण अश्या प्रकारे हात भट्टी दारू काढत आहे त्यांचा तपास करून मूळ मालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे,
बारामती तालुका पोलीस स्टेशन च्या व राज्य उत्पादन शुल्क विभाग च्या माध्यमातून या लोकांच्या वरती कारवाई होणार का.? बारामती तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत मेडद हे गाव असल्याने अनेक वेळा कारवाई केली होती परंतु पुन्हा नव्याने ह्या भट्ट्या चालू होतात, मेडद तेथील नागरिकांनी बोलताना सांगितले की बारामती तालुका पोलीस अधिकारी या अवैध दारू धंद्याला चाप लावतील अशी अपेक्षा नागरिकांच्या मनातून व्यक्त होत आहे. मेडद या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर  दारू तयार करून  छोटया व्यावसायिकाना विकली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकार पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्षात घेऊन गोरगरिबांचे होणारे उद्धवस्त संसार वाचवण्यासाठी तत्काळ शोध घेऊन संबंधित अवैधरीत्या दारू तयार करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी हीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.तर भल्या पहाटे टू व्हीलर व फॉरव्हिलर गाडीतून कॅन मधून ही दारू शहरी भागात व ग्रामीण भागात विकण्यास येत असल्याचे कळतंय तरी अश्या हातभट्टीची दारू काढणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होईल का ?अशी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.

No comments:

Post a Comment