रमजान ईद व अक्षय तृतीया च्या निमित्ताने मंचर पोलिसांचे पथसंचलन..
आंबेगाव तालुका प्रतिनिधी:- मंचर तालुका आंबेगाव येथे ता.03 मे 2022 रोजी होणारे रमजान ईद आणि अक्षय तृतीयेच्या अनुषंगाने मंचर शहरात मंचर पोलीस स्टेशन चे वतीने पथसंचलन करण्यात आले. सदर पथसंचालनामध्ये मंचर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री सतीश होडगर, यांचे मार्गदशनाखाली २सपोनि, ३ पोलीस उपनिरीक्षक, २२ पोलीस अंमलदार, एस आर पी एफ ग्रुप १०चे १ पोलीस उपनिरीक्षक आणि २८पोलीस अंमलदार, ३६ होमगार्ड यांनी सहभाग घेऊन, मंचर शहरात पथसंचलन केले.
No comments:
Post a Comment