युवराज शहाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते छायाताई खैरनार(यु.म.आघाडी प्रदेशाध्यक्ष) यांना ,गुणगौरव सन्मानचिन्ह, "समाजरत्न" पुरस्काराने,सन्मानित.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 26, 2022

युवराज शहाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते छायाताई खैरनार(यु.म.आघाडी प्रदेशाध्यक्ष) यांना ,गुणगौरव सन्मानचिन्ह, "समाजरत्न" पुरस्काराने,सन्मानित..

युवराज शहाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते छायाताई खैरनार(यु.म.आघाडी प्रदेशाध्यक्ष) यांना ,गुणगौरव सन्मानचिन्ह, "समाजरत्न" पुरस्काराने,सन्मानित..                           मुळशी:-  युवराज शहाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते छायाताई खैरनार(यु.म.आघाडी प्रदेशाध्यक्ष) यांना ,गुणगौरव सन्मानचिन्ह,"समाजरत्न"पुरस्काराने,सन्मानित करण्यात आला.दिनांक२५/५/२०२२रोजी,मुळशी तालुका जिल्हा पुणे या ठिकाणी छावा क्रंतिविर सेना, आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी राजे जन्मोत्सव सोहळा युवराज शहाजी राजे छत्रपती व छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला, मुळशी गावातून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर सुंदर्बन लॉन्स या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रारंभी पुष्पहार व तलवार भेट दिली, आजचा हा कार्यक्रम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा होत असताना  स्वराज्यासाठी काहीतरी केले पाहिजे ही तळमळ माझ्यामध्ये सुरुवातीपासून आहे यावेळी त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक पैलू आपल्या भाषणातून उपस्थितांसमोर मांडले आणि आजच्या तरुण पिढीला एक नवा संदेश नवी उमेद देण्याचे प्रयत्न त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले भाषण समारोप वेळी त्यांनी या कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कार्यामध्ये छायाताई खैरनार यांचा गुणगौरव सन्मानचिन्ह देऊन"समाजरत्न"पुरस्काराने सन्मानित केले तसेच मान्यवरांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले त्यांनाही शुभेच्छा दिल्या आणि या पुरस्काराच्या माध्यमातून आपण आणखी चांगले कार्य कराल अशी आशाही व्यक्त केले तसेच  गेल्या दोन वर्षापासून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण सर्व राजधानी रायगड या ठिकाणी येऊ शकला नाही त्यामुळे आज मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणाहून निमंत्रित करतो की आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनीही आपल्या भाषणामध्ये सांगितले की छत्रपती घराण्यातले युवराज एवढं मोठं घराण्याचं वलय असतानासुद्धा सर्वसामान्य मावळ्यांवर किती प्रेम करतात आज आपल्या या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावून येथील सर्व मावळ्यांना नवीन ऊर्जा देण्याचे काम केलेला आहे त्यांचे आजचे मार्गदर्शन आपल्या सगळ्यांसाठी पुढील काळामध्ये आपले जीवन घडविण्यासाठी निश्चित प्रेरणादायी असेल छत्रपती शहाजी महाराजांनी आज मुळशी या तालुक्यात येऊन येथील समस्त जनतेला आपल्या उपस्थितीने नवचैतन्य निर्माण केले छत्रपतींचे चौदावे वारसदार साक्षात त्यांच्या दर्शन या ठिकाणी आपल्या सर्वांना घेण्याचे भाग्य मिळाले आणि ते त्यांनी म व्यासपीठावर संघटनेचे प्रदेश महासचिव शिवाजीराव मोरे, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक गंगाधर काळकुटे, महादेव देवसरकर,  पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विशाल गव्हाणे, जिल्हाध्यक्ष सागर भोसले, महिला युवा प्रदेशाध्यक्ष छायाताई खैरनार, , विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष राजू फाले, युवक जिल्हाध्यक्ष विजय जरे, शहराध्यक्ष बिपिन दिवेच्या, उपजिल्हा अध्यक्ष रवी सातपुते, खेड तालुका अध्यक्ष उमेश डरपे, यांसह छावा क्रांतिवीर सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन मुळशी तालुका अध्यक्ष तानाजी वाळुंज यांनी केले होते.

No comments:

Post a Comment